जळगावातील पोलीस ठाण्यांना मिळाले नवीन निरीक्षक!

0
जळगाव – जिल्ह्यातील काही निरीक्षकांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. इतर जिल्ह्यातून आलेल्या नवीन निरीक्षकांची जळगावातील पोलीस ठाण्यात पदस्थापना करण्यात आली आहे. बदलीचे आदेश मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी काढले.
पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात सेवेचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली होती. इतर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून अनेक निरीक्षक आले होते. मंगळवारी त्यांची रिक्त पदांवर पदस्थापना करण्यात आली. त्यात मानव संसाधन विभागाचे विलास सोनवणे यांची जिल्हापेठ पोलीस ठाणे, नंदुरबारहून आलेले दीपक बुधवंत यांची रामानंदनगर पोलीस ठाणे., नाशिक ग्रामीण येथून आलेले रविकांत सोनवणे यांची जळगाव शहर पोलीस ठाणे, अंबादास मोरे यांची धरणगाव, सुनील खरे यांची बोदवड, लिलाधर कानडे यांची पारोळा, विजय ठाकुरवाड यांची चाळीसगाव शहर, नाशिक शहर येथून आलेले विनायक लोकरे यांची चोपडा शहर पो.स्टे.च्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांची नियुक्ती
तसेच मुंबईहून हजर झालेले सहाय्यक निरीक्षक यांची भुसावळ बाजारपेठ, नाशिक येथून आलेले सहाय्यक निरीक्षक पवन देसले यांची पाळधी येथे तर पाळधी येथील उपनिरीक्षक जगदीश मोरे यांची जळगाव शहर पो.स्टे.ला नियुक्ती करण्यात आली आहे.