जळगावात पुन्हा एक खून ; शाहूनगरातील तरुणाची हत्या!

0

जळगाव: शहरातील शाहूनगरातील रहिवाशी तरुणाची कोंबडी बाजारातील हॉटेल युवराजजवळ रात्री हत्या करण्यात आली आहे. प्रसाद सिद्धेश्वर जंजाळे (३६) असे मृत तरुणाचे नाव आहे. आज गुरुवारी सकाळी जेएमपी मार्केटमध्ये एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. एका नस्त्याच्या गाडीवर झालेल्या वादातून खून झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर अधिक्षक निलाभ रोहन यांनी घटनास्थळाची पाहणी केली.