जळगावात शनिपेठेत परिसरात डीपीला लागली आग

0

जळगाव – शहरातील शनिपेठ परिसरातील घरकुल चौकातील महावितरणच्या डीपीला सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने या डीपी शेजारील काही टपर्याचेही ही नुकसान झाल्याची माहिती आहे.

महापालिकेचा अग्निशमन बंब बोलावुन आग विझविण्यात आली. या परिसरात नागरिकांसाठी ही एकच डीपी असल्याने त्यावरील अतिभारामुळे महिनाभरातील ही आगीची तिसरी घटना आहे. या प्रकाराबाबत महावितरण कंपनीविरुद्ध येथील महिला व नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली मात्र तरीही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार घडत असल्याचे येथील नागरिकांच्या म्हणणे आहे. महावितरण कंपनी मोठ्या दुर्घटनेची तर वाट बघत नाहीये ना असा संतप्त सवालही येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.

जळगावात शनिपेठेत परिसरात डीपीला लागली आग 1