जळगावात साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

0

जळगाव- अन्न व औषध प्रशासनास खब-याव्दारे शहरात प्रतिबंधीत अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न ) यो. को. वेंडकुळे व अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील व अनिल गुजर यांनी शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास स्टेडियम कॉम्प्लेक्स, विंग सी. येथून 18 बॉक्स जप्त केले. त्यात केशरयुक्त विमन पानमसालाचे प्रत्येकी 176 ग्रॅमचे एकूण 1800 पाकीटे आढळली. या प्रकरणी राजेंद्र विनायक बाविस्कर यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी हा माल आपलाच असल्याची कबुली दिली. तीन 56 हजार 600 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली.