जळगाव खुर्द रहिवाश्यांच्या स्नेहमेळाव्यात रंगल्या गावाकडच्या आठवणी

0

पुणे ः जळगाव जिल्ह्यातील जळगांव खुर्द येथील नागरिकांचा पुण्यात नुकताच स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी, एकत्रित जमलेल्या जळगाव खुर्द वासियामध्ये गावाकडच्या आठवणी चांगल्याच रंगल्या. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वललाने झाली. यावेळी रामदास पाटील, नरेंद्र झोपे, अनिल भारंबे, सुभाष अत्तरदे, अशोक पाटील, मोहन पाटील, दत्तात्रय पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक नामदेव ढाके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनिल भारंबे यांनी भक्ती गीत सादर केले. प्रसंगी, शकुंतला अत्तरदे यांनी गावातील आठवणींना उजाळा दिला. लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामदास पाटील, नरेंद्र झोपे, अनिल भारंबे, शशी राणे, राहुल काळे, गुणवंत महाजन, चेतन झोपे, प्रमोद अत्तरदे, सागर पाटील यांनी परिश्रम घेतले. मित्तल भारंबे यांनी सुत्रसंचलन केले.