Friday , February 22 2019

जळगाव जिल्हाधिकारीपदाचा डाॅ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला पदभार

जळगाव – जळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी सोमवारी मावळते जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्ह्यात होणाऱ्या कामांचा आढावा घेण्यापुर्वी सर्व प्रशासकीय विभागाच्या कामांची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच पोलीस अधिक्षक, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक बोलावून कामांचा क्रम ठरविण्यात येणार असल्याची माहिती नूतन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

शुभेच्छा देण्यासाठी नागरीकांची गर्दी
मावळते जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आपल्या कामांबाबत माहिती दिली. जवळपास 90 टक्के कामे मर्गी लागले असल्याचे त्यांना सांगितले. नूतन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी १२ वाजेच्या सुमारास येवून मावळते जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर याच्याहस्ते पदभार स्विकारला. नव्या जिल्हाधिकारी यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेर विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

भुसावळात इंग्रजीच्या पेपराला 50 विद्यार्थ्यांची दांडी

भुसावळ- बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!