जळगांव विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यावर रसायन फेकून हल्ल्याचा प्रयत्न

0

जळगाव: रा.प.जळगांव विभागाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे हे रोजच्या प्रमाणे सकाळी १०.३० वा. जळगांव बसस्थानकात गाडीतुन उतरुन विभागीय कार्यालयात येत असतांना विभागीय कार्यालयाचे खाली जळगांव आगाराच्या स्थानक प्रमुख निलिमा बागूल यांच्याशी बोलत असतांना जिन्यात आगोदरच दबा धरून बसलेल्या धुळे विभागातील अक्कलकुवा आगारात वाहक पदावर कार्यरत असलेल्या सुनिता लोहार या पुर्वनोयोजितपणे ठरवून पळतच जिन्यातुन खाली धावत आल्या व त्यांचे जवळील रसायन विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांचेवर फेकले असता सदरच्या रसायनामुळे देवरे यांचे उजव्या डोळ्याला किंचित दुखापत झाली

सदर घटने नंतर श्रीमती लोहार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर विभाग नियंत्रक श्री.राजेंद्र देवरे यांनी डॉ.दिपक आठवले यांचे कडे डोळे तपासणी करुन उपाचर घेतले व अस्वस्थ वाटू लागल्याने पुढील उपचारासाठी डॉ.ए.जी.भंगाळे यांचे दवाखान्यात दाखल करण्यात आले असून प्रकृति स्थिर आहे.