LIVE….प्रभाग क्रमांक १९ मधून सेनेचे तिन उमेदवार विजयी

0

जळगाव-जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक १९ मधून शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. यात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनावणे, जिजाबाई भापसे, गणेश सोनवणे हे विजयी झाले आहे.

प्रभाग 15 अमध्ये शिवसेनेचे सुनील महाजन 1450 मतांनी आघाडीवर असून भाजपचे मेहमूद बागवान 410 मते घेऊन दुसर्‍या स्थानावर आहे. ब मध्ये शिवसेनेच्या जयश्री महाजन या 1423 मते घेऊन पहिल्या स्थानावर असून भाजपच्या रिजवाना खान 465 मतांनी दुसर्या स्थानावर आहे. तर क मध्ये समाजवादी पक्षाच्या जाहेदाबी शेख 956 मतांनी आघाडीवर आहेत तर ड मध्ये अशोक लाडवंजारी 701 मते घेऊन आघाडीवर आहे.