जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेसमोर झोकून देत महिलेची आत्महत्या

0

मोबाईलमधील क्रमांकावर संपर्क केल्याने पटली ओळख ः प्लास्टिकची कॅरीबॅगसह विविध वस्तू आढळल्या

जळगाव– शहरातील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या अपलाईनवर पूजा विनोदकुमार बजाज वय 40, टी.एम.नगर, रा. सम्राट कॉलनी या महिलेने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना 3.40 वाजेदरम्यान आत्महत्या केल्याची घटना घडली. महिलेजवळ रेल्वेचे टिकिट, दोन मोबाईल, कपडे असलेली प्लॉस्टिकची पिशवी असा साहित्य सापडले आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

सम्राट कॉलनी परिसरातील पूजा बजाज यांचे पतीचे 12 वर्षापूर्वी निधन झाले आहे. चार महिन्यांपासून पूजा ह्या त्यांच्या बहिणीकडे अमरावती येथे राहत होत्या. आज सकाळी वर्धा येथून त्या जळगावला आल्या. येथे आल्यानंतर त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 येथे रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. स्टेशन प्रबंधक पारधी यांनी याबाबत लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. त्यानुसर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्दार्थ इंगळे, हेडकॉन्स्टेबल अजय बर्वे, योगेश चौधरी, अजय मून यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी महिलेजवळील मोबाईल मिळून आला. त्यातील मोबाईल पूजा यांचे दीर मनोज रोशनलाल बजाज यांच्या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांनी प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार मनोज बजाज यांनी घटनास्थळ गाठले. मयत पूजा बजाज असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

पूजा बजाज हिच्याजवळ प्लास्टिकची पिशवी, पर्स, दोन मोबाईल, चार्जर, शाल, अंगावरील कपडे, पेन, व काही रोख रक्कम असे साहित्य मिळून आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. पूजा यांच्या पश्चात मुलगा साहिल, मुलगी संजना असा परिवार आहे. साहिल हा नागूपर येथे तर संजना नाशिक येथे नोकरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.