जळगाव लोकसभेत ५ हजार ६४० तर रावेरात १ हजार ८१२ सर्व्हिस वोटर्स

0

जळगाव – लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजारहून अधिक सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत इलेक्ट्रॉनिकरित्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.
यंदा प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात १ लाख ४ हजार ४३५ इतक्या सर्व्हिस वोटर्सची संख्या असून त्यात आतापर्यंत सुमारे ४ हजारांची भर पडली आहे. सर्व्हिस वोटर्स नोंदणीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. अंतिम मतदार यादीनुसार १ लाख २ हजार ६१७ पुरुष तर १ हजार ८१८ महिला सर्व्हिस वोटर्स आहेत. यात जळगाव लोकसभा मतदारसंघात-५ हजार ६४०, तर रावेर लोकसभा मतदारसंघात -१ हजार ८१२ सर्व्हिस वोटर आहेत. या मतदारांना १० दिवस आधी ऑनलाईन पध्दतीने मतपत्रिका पाठविल्या जातात.