Friday , February 22 2019

जळगाव विमानतळ घोटाळ्यात हायप्रोफाईल आरोपी

प्रदीप रायसोनी, सिंधू कोल्हे यांच्यासह सात जणांना समजपत्र

जळगाव : विमानतळ योजनेतील गैरव्यवहार व अनियमितताप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या दोषारोपाची गुरुवारी न्यायालयात पडताळणी करण्यात आली. या
प्रकरणातील संशयित प्रदीप ग्यानचंद रायसोनी, सिंधू विजय कोल्हे यांच्यासह सात जणांना शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांच्या न्यायालयात हजर राहण्याचे समजपत्र बजावण्यात आले आहे.

नगरपालिकेतर्फे विमानतळ योजना राबविताना ३ कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार तत्कालीन नगरसेवक नरेंद्र भास्कर
पाटील यांनी दिली होती. त्यानुसार २०१२ मध्ये जळगाव शहर पोलीस स्टेशनला भाग ५,
गु.र.नं.११०/२०१२ भादवि कलम ४०३, ४०६, ४०९, ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

तत्कालीन नगरपालिका उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असलेले प्रदीन ग्यानचंद रायसोनी, नगराध्यक्ष सिंधू विजय कोल्हे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, चत्रभूज सोमा सोनवणे, मुख्याधिकारी पंढरीनाथ धोंडीबा काळे, धनंजय दयाराम जावळीकर व अ‍ॅटलांटा कंपनीचे संचालक राजू ए.बरोत
यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

एक आठवडा आधी समजपत्र

या गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी या गुन्ह्यातील संशयितांना एक आठवडा आधीच जामीनदारासह न्यायालयात हजर राहण्याबाबत समजपत्र बजावले आहे. सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे त्यात
नमूद केले आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून बच्छाव यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी गुरुवारी न्यायालयात
दोषारोपपत्राची कागदपत्रे सादर केली. सायंकाळी उशिरापर्यंत या कागदपत्रांची पडताळणी सुरु होती.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

भुसावळात इंग्रजीच्या पेपराला 50 विद्यार्थ्यांची दांडी

भुसावळ- बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!