जळगाव: – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून कोव्हिड-19 विषाणूमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून गणपती हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव हे हॉस्पिटल त्यांच्या अधिनिस्त असलेले मनुष्यबळ, साधन सामग्री, ॲम्ब्युलन्स अधिग्रहीत करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
अत्यावश्यक बाब म्हणून हे हॉस्पिटल 14 मे, 2020 पासून पुढील आदेशापर्यंत डेडिकेटेड कोविड-19 म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे आदेश डॉ अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यानी निर्गमित केले आहे.