जवानांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा वाढवण्याचे बिपीन रावत यांचे संकेत

0

नवी दिल्ली: भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी जवानांची सेवा निवृत्तीचे वय वाढवण्याचे संकेत दिले आहे. जवानांचे सेवानिवृत्ती वय ५८ करण्यासाठी लष्कराच्या तिन्ही दलांकडून संशोधन करण्यात येत असल्याचे बिपीन रावत यांनी सांगितले. लष्कराचे अधिकारी वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. या वयापर्यंत त्यांची मुलं सेटल होतात किंवा सेटल होण्याच्या मार्गावर असतात. त्यामुळे ही समस्या अधिकाऱ्यांचीच नाही तर जवानांची आहे.

जवानांची नियुक्ती वयाच्या १८ व्या वर्षी केली जाते. ते लष्करातून वयाच्या३७-३८ व्या वर्षी निवृत्त होतात. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागते, असे बिपीन रावत यांनी सांगितले.

याशिवाय, सरकारने डिफेंस बजेटमध्ये ३. १८ लाख कोटी वाढवून २०२०-२१ मध्ये ३. ३७ लाख कोटी केले आहे. यामुळे लष्काराचे आधुनिकीकरण केले जाऊ शकते. आर्मी मेडिकल कॉर्प चा विचार केल्यास मला वाटते की, १०० टक्के एएमसीचे जवान ५८ वर्षांपर्यंत सेवा देऊ शकतात, असेही बिपीन रावत यांनी सांगितले.