जागतिक महिला दिनानिमित्त २० शेतकरी महिलांचा सन्मान

मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव

नंदुरबार । कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणार्‍या २० शेतकरी महिलांचा खा.डॉ. हिना गावित व आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आ.डॉ.विजयकुमार गावित होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी विज्ञान केंद्र कोळद्याचे कार्यक्रम समन्वयक राजेंद्र दहातोंडे, माविमचे संजय सांगेकर, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.चौधरी, आर.डी.वळवी, निलेश गढरी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील २० प्रगतीशिल महिला शेतकर्‍यांना त्यांच्या शेती क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुरुवातीला महिला बचत गटांनी बनविलेल्या विविध खाद्यपदार्थ व गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी गटाचे संत शिरोमणी सावता माळी रयत अभियान अंतर्गत स्ट्रॉबेरी व भाजीपाला स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक अनंत पोटे आणि राजेंद्र दहातोंडे यांनी केले.
सत्कारार्थी महिला अशा
नंदुरबार जिल्ह्यातील २० प्रगतीशिल सत्कारार्थी महिला शेतकर्‍यांमध्ये सुनिता दारासिंग रावताळे (रा.आडगाव, ता.शहादा) सुनाबाई सुनील वळवी (रा.तलावीपाडा, ता.नवापूर), अर्चना सुरुपसिंग वळवी (रा.पालीपाडा ता.नवापूर), दुर्गाताई राजु गावित (रा.सावरट, ता.नवापूर), रुषा रामसिंग वळवी (रा.कंजाला, पो.भगदरी, ता.अक्कलकुवा), रिताताई मनोहर पाडवी (रा.मोलगी, अक्कलकुवा), टेटीबाई कुशल पावरा (रा.उमराणी, ता.अक्राणी), सुरेखाताई जगन गावित (रा.अक्राणी), शकुंतला रमण चौधरी (रा.मोहिदा, ता.तळोदा), कल्पना भिका चौधरी (रा.तळोदा), कल्पना विनोद पाटील (रा.जुनमोहिदा, ता.नंदुरबार),आशाताई कोमलसिंग राजपूत (रा.बलदाणे, ता.नंदुरबार), विमलबाई आंताराम भोये (रा.वाघाळे, ता. नंदुरबार), गंगुबाई राम चौरे (रा.वाघाळे, नंदुरबार), मंगलाबाई पवार (रा.मुबारकपूर, ता.शहादा), निशा कासार (नंदुरबार), अर्चना गुलाब मराठे (रा.धामडोद, ता.नंदुरबार), ज्योत्स्ना नरेंद्र भट (रा.होळतर्फे हवेली, नंदुरबार), संगिता कल्याण अग्रवाल (रा.राकसवाडे, ता.नंदुरबार), इस्टर हिरामण भिल (रा.राकसवाडे, ता.नंदुरबार), वर्षा शरद पाटील (रा.पळाशी, ता.नंदुरबार) यांचा समावेश आहे.