जातीवाचक शिवीगाळ ; चिखलीच्या 12 जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

0

फैजपूर- चिखली, ता.यावल येथील जातीवाचक शिवीगाळ करून एकास जबर मारहाण केल्याची घटना 12 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मारहाण झालेला ललित मुकुंदा तायडे (20) यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी मारहाण करणार्‍या 11 जणाविरुद्ध दंगलीचा व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल
करण्यात आला.

तक्रारदाराचे डोके आपटले
ललित मुकुंदा तायडे याला चिखली बु येथील बस स्टॅण्डजवळ आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली व जवळच असलेल्या निंबाच्या झाडाच्या ओट्यावर त्याचे डोके आपटून गंभीर इजा केली या घटने नंतर जखमी ललित यास जळगांव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मारहाण करणार्‍या विकास सुधाकर पाटील , बापू नामदेव पाटील, विजय नामदेव पाटील , दिपक नारायण पाटील, सचिन मुकुंदा पाटील, मुकुंदा नामदेव पाटील, पंकज सुकलाल पाटील, चंद्रकांत सुकलाल पाटील, मोहन विठ्ठल पाटील, सुपडू दशरथ पाटील, सुनील नामदेव पाटील (सर्व रा.चिखली) यांच्याविरुद्ध दंगलीचा व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे करीत आहेत.