जामनेरात गरजुंसाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले

0

जामनेर। कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व काही बंद असुन ज्या गरीब लोकांचे हातावरती पोट आहे, अशा जामनेर शहरातील गरजु लोकांना आणि सर्व खासगी रुग्णालये येथे जाऊन सामाजिक कार्यकर्ते कमलेश जैन व दिपक कावडीया यांनी गरीब व गरजु लोकांना खिचडी वाटप करण्यात आहेत. त्यांचा हा प्रेरणादाई उपक्रम दररोज सुरू राहणार आहे, असे त्यांनी सांगीतले. या कार्यात हातभार लावायला जय माता दि सेवा मंडळाच्या माध्यमातुन जीतु शर्मा,राजु शर्मा, नानुभाई शहा, मुकेश बुळे, योगेश वाणी, पंकज माळी, विठ्ठल माळी, पप्पु लंकड आदी स्वयंस्फुर्तीने मदत करत आहेत.