जितेंद्र आव्हाडांची चौकशी करा

0

पिंपरी-गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी असल्याचा निराधार आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे, असे आरोप करुन लोकांमध्ये संभ्रम पसरवित आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या आणि आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी केली आहे. आकुर्डीत आज (मंगळवारी) त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

रविवारी संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच निधन झाले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे, अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट ्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. यावर बोलताना डॉ. गो-हे म्हणाल्या, आव्हाड यांच्याकडे काही माहिती आहे, कोणत्या आधाराने ते असा आरोप करत आहेत? निराधार आरोप करुन लोकांमध्ये संभ्रम पसरवणे चुकीचे आहे. त्यांचे निकटवर्तीय, कुटुंबीयांना अशी व्यक्तव्ये करुन आपण मनस्ताप देत आहोत. एका माजी संरक्षण मंत्र्यावर अशी विधाने करणे चुकीचे आहे. त्यामुळे आव्हाड त्यांची केंद्रीय गृहमंत्रालयाने चौकशी करावी. आव्हाड यांच्याकडे काही पुरावे असल्यास स्वत: न्यायलयात जाऊन तो त्यांनी सिद्ध करावा. सरकारने चौकशी केली नाही. तर त्यांनी स्वत:हून कोर्टाकडे पुरावे द्यावेत, असे मी आव्हान देते, असेही गो-हे म्हणाल्या.