जिल्हाभरात दुचाकी चोरणार्‍या सहा तरुणांच्या मुसक्या आवळल्या

0

5 लाख 80 रुपयांच्या 17 दुचाकी हस्तगत

जळगाव- नव्या-कोर्‍या दुचाकी चोरी करुन चोरी करुन तिला कागदपत्रे आणून देतो म्हणून आदिवासी भागात, भिल वस्त्यांमध्ये अवघ्या 10 ते 15 हजार रुपये किमतीत विक्री करायची. अशा पध्दतीने जिल्हाभरात विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणार्‍या तरुणांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. दीपक गोपाळ कोळी (वय.22,रा.डांभूर्णी, ता.यावल), अजय ईश्वर कोळी (वय 21, रा.दहिगाव संत, ता.पाचोरा), प्रवीण भाईदास कोळी (वय 20, रा.विखरण, ता.एरंडोल), संदिपक राजु कोळी (वय 19), रमजानशहा शकुरशहा (वय 19), प्रशांत उर्फ गोलू निंबा कोळी (वय 20, तीघे रा.कुरंगी, ता.पाचोरा) अशी संशयिताची नावे असून त्यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेने 5 लाख 80 हजार रुपये किमतीच्या 17 दुचाकी हस्तगत केल्या आहे याबाबतची माहिती, शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कर्मचारी सुरज पाटील करीत होते 2 महिन्यांपासून अभ्यास
दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमिवर स्थानिक गुन्हे शाखेचे सुरज पाटील दोन महिन्यांपासून अभ्यास करत होते. ते जिल्हाभरातील ठिकठिणाच्या त्यांच्या खबर्‍यांच्या संपर्कात होते. एके दिवशी सुरत पाटील यांना डांभूर्णी येथील दीपक कोळी हा वर्षभरापासून दुचाकी चोरी करीत आहेत. त्याने चार-पाच दुचाकी अत्यंत कमी किमतीत विकल्या आहेत. अशी माहिती मिळाली. याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवून सुरज पाटील यांनी पोलिस निरीक्षक बापू रोहोम, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अशोक महाजन, कमलाकर बागुल, सुरज पाटील, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, परेश महाजन, इंद्रीस पठाण, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने या दीपक कोळी व त्याच्या सांगण्यानुसार इतर सहा जणांना अटक केली. या टोळीचा दीपक कोळी हा म्होरक्या आहे.

अशी होती दुचाकी चोरी, विक्रीची पद्धत
दीपक कोळी हा प्रमुख संशयित आहे. सर्वप्रथम त्याने पाच दुचाकी चोरी करुन विकल्या. यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर पाचही संशयितांचा सहभाग आला. ही टोळी केवळ नव्या-कोर्‍या दुचाकी चोरी करीत असे. यानंतर ग्रामीण, आदीवासी भागात दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधायचे. गरज असल्यामुळे तात्काळ नवी दुचाकी विकायची आहे, कागदपत्र नंतर आणून देतो. असे सांगून ते ग्राहकांना भुरळ घालयाचे. नवीन दुचाकी अगदी कमी किमतीत मिळत असल्यामुळे त्यांना सहजपणे ग्राहक मिळत होते. एकदा दुचाकी विकुन पैसे घेतले की हे चोरटे परत ग्राहकाला संपर्क करीत नसे. किंवा ग्राहकाने केलेल्या फोन कॉलला देखील उत्तर देत नव्हते. त्यामुळे ग्रहकाला दुचाकीचे कागदपत्र मिळत नव्हते. पहुर, जामनेर, पिंपळगा हरे, धरणगाव, जामनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा या ठिकाणांहुन त्यांनी दुचाकी चोरल्या होत्या.

व्हेईकल सेलची स्थापना
दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता संबधित पोलिस ठाण्यासह व्हेईकल सेल समांतर तपास करणार आहे. चोरीची वाहने तात्काळ शोधण्यासाठी पोलिस अधिक्षक डॉ.उगले यांनी या व्हेईकल सेलची स्थापना केली आहे. या सेलच्या माध्यमातून गुन्हे लवकरात लवकर उघडकीस येतील, अशी अपेक्षा उगले यांनी व्यक्त केली आहे.

पाचोरा पोलीस ठाण्याचा तो पोलीस कर्मचारी कोण?
या घटनेत अजय कोळी , संदिप कोळी, रमजानशहा शकुरशहा, प्रशांत उर्फ गोलू निंबा कोळी हे चौघे संशयित पाचोर तालुक्यातील आहेत. हे संशयित दुचाकी चोरी करु विक्री केल्याबाबतची माहिती पाचोरा पोलीस ठाण्यात एका कर्मचार्‍याला होती, मात्र दुचाकी चोरीनंतर मिळणार्‍या पैशांमध्ये या कर्मचार्‍याचा हिस्सा होता. पोलीसच संपर्कात असल्याने संशयितांची हिम्मत वाढली व त्यांनी इतर ठिकाणाहून दुचाकी चोरल्या. ते म्हणतात ना कानून के हाथ लंबे होते, याप्रमाणे अखेर स्थानिक गुन्हे शाखा संशयितांपर्यंत पोहचली. त्या कर्मचार्‍याबाबत पोलीस अधीक्षकांना विचारले असता, चौकशी सुरु आहे, यात पोलीस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यालाही आरोपी करण्यात येईल, असे उगले यांनी सांगितले. दरम्यान तो पोलीस कर्मचारी कोण याबाबतही पोलीस कर्मचार्‍यांमध्ये एकच चर्चा सुरु आहे.