Sunday , March 18 2018

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 23 मार्चला

पुणे । जिल्हा परिषदेचा 2018-19 सालचा अर्थसंकल्प 23 मार्चला होणार्‍या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. मागील 2017-18 मध्ये 168 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प 200 कोटींचा आकडा पार होणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

अंदाजपत्रकाचे अवलोकन होऊन मान्यता
जिल्हा परिषदेच्यावतीने सादर करण्यात येणार्‍या अर्थसंकल्पात जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस निधीचे 2017-18 मधील अंतिम सुधारित व 2018-19 चे मूळ अंदाजपत्रकाचे अवलोकन होऊन मान्यता देण्यात येणार आहे. तसेच दक्षिण बांधकाम विभाग कार्यक्षेत्रातील निविदांना मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा ग्रामविकास निधीतून ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी कर्ज मंजूर करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. तर जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीवरील रिक्त झालेल्या जागांच्या निवडणुकीबाबत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा

आकर्षक शोभायात्रांनी गुढीपाडवा सजला

ढोलताशांचा दणदणाट, लेझीमचं शिस्तबद्ध संचलन, पारंपारिक पोशाखात नटलेल्या मंडळींचा सहभाग घराघरांवर उभारल्या गुढ्या : वाहनांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *