जिल्हा परीषदेचा लाचखोर लिपिक जळगाव एसीबीच्या जाळ्यात

0

सेवानिवृत्ताची फाईल पुढे सरकावण्यासाठी स्वीकारली तीन हजारांची लाच

जळगाव- सेवाविृत्त कर्मचार्‍याची फाईल त्रृट्यांची पुर्तता करून पुढे सरकावण्यासाठी तीन हजारांची लाच मागणार्‍या जळगाव जिल्हा परीषदेतील बांधकाम विभागातील वरीष्ठ लिपिक देविदास ओंकार सोनवणे (57, वाघ नगर, जळगाव) यास जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केली. दरम्यान, गुरुवारीच नवीन विद्युत मीटर बसवून देण्यासाठी तीन हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या जळगावच्या पिंप्राळ्यातील वीज कंपनीच्या वरीष्ठ तंत्रज्ञ व सिनियर टेक्नीशीयन असलेल्या मयुर अशोक बिर्‍हाडे (31) यास पकडण्यात आल्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या कारवाईने जिल्ह्यातील लाचखोर अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

लाचेची मागणी भोवली
60 वर्षीय तक्रारदार हे जिल्ह्यातील रहिवासी व जिल्हा परीषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांच्या पेन्शन फाईलमधील त्रृट्यांची पूर्तता करून फाईल पुढे सरकावण्यासाठी संशयीत आरोपी तथा जि.प.च्या बांधकाम विभागातील वरीष्ठ लिपिक देविदास सोनवणे यांनी 7 रोजी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर शुक्रवार, 8 रोजी दुपारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराच्या दुचाकीवर बसल्यानंतर आरोपीने नेरी नाक्याजवळील एका कॉम्प्लेक्सजवळ दुचाकी थांबवून लाच स्वीकारताच त्यास पंचांसमक्ष अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, हवालदार अशोक अहिरे, नाईक मनोज जोशी, शामकांत पाटील, सुनील शिरसाठ, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, अरुण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.