जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून भुसावळात वार्षिक तपासणी

0

भुसावळ- जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शनिवारी दुपारी बाजारपेठ पोलिस ठाण्यासह पोलिस उपअधीक्षक कार्यालयाची वार्षिक तपासणी केली. गुन्हेगारांना समन्स बजावण्यासह शिक्षेचे प्रमाण अधिकाधिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच गुन्हेगारी कमी करण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांना केल्या. याप्रसंगी त्यांनी कर्मचार्‍यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुपारी तीन वाजता डॉ.उगले भुसावळात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ व डीवायएसपी कार्यालयात दप्तरराची तपासणी केली. याप्रसंगी बाजारपेठ व डीवायएसपी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.