जिल्हा लॅायर्स कंझुमर को ॲाप.सोसायटीतर्फे पोलीस कर्मचार्‍यांना सॅनीटायझरचे वाटप

0

जळगाव :- जिल्हा लॅायर्स कंझुमर को ॲाप.सोसायटीतर्फे तसेच समर्थ इंडस्ट्रीज च्या सहकार्याने जनतेची अहोरात्र सेवा करणार्‍या पोलिस बांधवांना ५० एमएलच्या ४०० बोटल सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.

पोलिस उपअधीक्षक निलाभ रोहन यांना संस्थेचे वतीने बॉटल्स देण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष ॲड.संजय राणे,सचीव रमाकांत पाटील वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप बोरसे,सचीव दर्शन देशमुख, जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके, सिनीयर वकील अकील ईस्माइल, रविंद्र के पाटील व समर्थ इंडस्ट्रीज चे संचालक सतीश पाटील यांचे हस्ते देण्यात आले. शहरातील विविध चौकाचौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस बांधवांना सुद्धा सॅनीटायझर बॉटल्स देण्यात आले.