जिल्ह्यातील आरोग्य अधिकार्‍यांची भरती रद्द

0 1

पुणे : हेल्थ वेलनेस सेंटर (आरोग्यवर्धिनी केंद्र) अंतर्गत आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेला नुकतीच सुरूवात करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील उपकेंद्रांना आरोग्य अधिकारी मिळणार, अशी आशा असताना राज्य शासनाने ही भरतीच रद्द केली आहे.त्यामुळे उपकेंद्र आणखी किती दिवस आरोग्य अधिकार्‍यांविना पोरकी राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 539 उपकेंद्रांना वैद्यकीय अधिकारी मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत गावातील नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा मिळणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तांच्या आदेशानुसार, पुण्यासह अन्य जिल्हा परिषदांनी भरती प्रक्रियेला सुरूवात केली.