Friday , February 22 2019

जिल्ह्यातील तीन डीवायएसपींच्या बदल्या

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील तीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदलीचे आदेश नुकतेच प्राप्त झाले असून पाचोरा, चाळीसगाव आणि फैजपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या बदल्या आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले असल्याची चर्चा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात सुरू होती.

राज्यातील एकूण 43 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले आहे. पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांची जळगाव पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस उपअधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पातोंड यांच्या जागी नागपूर जिल्ह्यातील कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर मोहन कातकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चाळीसगाव पोलील उपविभागीय अधिकारी नजीर अब्दुल शेख यांची बदली औरंगाबाद ग्रामीण येथे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. तर फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांची औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती झाली तर त्यांच्याजागी धुळे येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विभागाचे पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पिंगळे यांची नेमणूक करण्यात आली.

Spread the love
  •  
  • 20
  •  
  •  
  •  
    20
    Shares

हे देखील वाचा

भुसावळात इंग्रजीच्या पेपराला 50 विद्यार्थ्यांची दांडी

भुसावळ- बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!