जिल्ह्यात आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

1

जळगाव – जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असुन आज आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ११ झाली आहे. कोविड रुग्णालयातून कोरोना संशयित म्हणून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व्यक्तींपैकी पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहे. या पाचही व्यक्ती यापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या अमळनेर येथील मृत महिलेच्या कुटूंबातील आहे. यामध्ये ४ पुरुष व एक महिलेचा समावेश असून हे सर्व पुरुष २७ व २८ वर्षीय तर महिला ३६ वर्षीय आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्याची रेडझोनकडे वाटचाल
जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आता जिल्ह्याची वाटचाल रेडझोनकडे सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीला दोन रूग्ण होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता तर एक जण बरा झाला. मात्र अमळनेर तालुक्यात चार रूग्ण पॉझिटीव्ह आढळुन आल्याने जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला. आता कोरोना बाधित कुटूंबातील पाच जण पॉझिटीव्ह आढळुन आल्याने जिल्ह्याची वाटचाल आता रेडझोनकडे सुरू झाली आहे.