जिल्ह्यात सलग दुसर्‍या कोरोनाचे त्रिशतक

0 1

 

दिवसभरात 13 बाधीत रुग्णाचा मृत्यू

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसर्‍या दिवशी त्रिशतक केले असून तीनशेचा आकडा पार केला आहे. आज नव्याने 305 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने सात हजारांचाही टप्पा ओलांडला असून एकूण रुग्णसंख्या 7275 झाली आहे. शुक्रवारी सर्वाधिक 52 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आज दिवसभरात जिल्ह्यात 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 52, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 28, अमळनेर 4, चोपडा 20, पाचोरा 26, भडगाव 25, धरणगाव 7, यावल 3, एरंडोल 4, जामनेर 48, रावेर 20, पारोळा 22, चाळीसगाव 16, मुक्ताईनगर 09, बोदवड 9 व अन्य जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात 13 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ तालुक्यातील 4, तर जळगाव ग्रामीण, चाळीसगाव आणि यावल या तालुक्यातील प्रत्येकी दोन , जामनेर व एरंडोल व जळगाव शहरातील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.