जि.प.अध्यक्षांना कोरोनाची लागण

जळगाव: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यातच जिल्हा परिषदेतही संसर्ग वाढला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहे. संपर्कात असलेल्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे. जिल्हा परिषदेतील बांधकाम, शिक्षण, अर्थ विभागासह इतरही विभागात बाधित आढळून आले आहे.

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात दोन कोरोना बाधित आढळून आल्याने शुक्रवारी १२ रोजी विभाग बंद ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी शिक्षण विभागातही दोन बाधित आढळून आले आहे.