जि.प.निवडणूक: नंदुरबारमध्ये कोणालाही बहुमत नाही; सत्तेची चावी सेनेच्या हातात !

0

नंदुरबार: आज राज्यातील सहा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी निवडणूक झाली. यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. भाजप आणि कॉंग्रेसला समसमान झगा मिळाल्या आहेत. भाजपला २३ तर कॉंग्रेसलाही २३ जागांवर विजय मिळाला आहे. सत्तेची चावी आता शिवसेनेच्या हातात असून शिवसेनेला सात जागांवर विजय मिळाला आहे.

या निवडणुकीत कॉंग्रेस नेते आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाटील या पराभूत झाल्या आहेत. शिवसेना उमेदवाराने त्यांचा पराभव केला.