ADVERTISEMENT
जळगाव: जिल्हा परिषदेत कोरोनाने कहर केला आहे. दोन पदाधिकारी आणि वरीष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील बड्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या उपचाराबाबत निर्णय प्रक्रियेतील बडा अधिकारी असल्याने एकच खळबळ उडाली आहे. कालच आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या पदाधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर आज आरोग्य विभागातील अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाशी लढणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कोरोनाचे संकट आल्याने चिंता वाढली आहे.