जि.प.सदस्य वर्षा पाटील यांनी स्व:खर्चाने केली फवारणी

0

निजर्ंंतूकीकरणासाठी सोडीयम हायपोक्लोराईडचा वापर ः नागरीकांनी व्यक्त केले समाधान

बोदवड : तालुक्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परीषद सदस्य वर्षा रामदास पाटील यांच्या पुढाकाराने जि.प.गटातील साळशिंगी, शेलवड, जामठी, येवती,रेवती, मुक्ताल,वराड,जलचक्र यांच्यासह संपूर्ण जिल्हा परीषीद गटातील गावांमध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतूकीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी स्वखर्चाने टँकरमध्ये ब्लिंचीग आणि सोडीयम हायपोक्लोराईड टाकून फवारणी केली जात आहे. गावातील प्रत्येक वॉर्डातील, गल्लीबोळात फवारणीसाठी तीन नवीन हँड पंप उपलब्ध केल्याने प्रत्येक वूर्डातही फवारणी केली जात आहे.

देशभरात कोरोना विषाणूने हाहाःकार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपाययोजना म्हणून निर्बंध लादले आहे. शासकीय कार्यालये, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी ब्लिंचीग आणि सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. किराणा दुकान बँका यांच्यासमोर एक मिटरचे सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) चा प्रभाव जाणवत आहे शिवाय नागरीक आखून दिलेल्या चौकटीतच व्यवहार करीत आहेत. असे असतांना शहरातील गल्लीबोळामध्ये नागरीक घोळक्याने उभे राहत असल्याने यावरही पोलिसांनी कडक पाऊले उचलण्याची अपेक्षा आहे अन्यथा खेड्यातील परीस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी तहसीलदार रवींद्र जोगी, कृषी उत्पन्न सदस्य रामदास पाटील, सभापती किशोर गायकवाड, विजय चैधरी उपस्थित होते.