जीएसटी भवनच्या ८ व्या मजल्यावर भीषण आग !

0

मुंबई: मुंबईत दररोज आगीच्या घटना समोर येत आहे. आज सोमवारी शासकीय कार्यालयाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी माझगांव येथील जीएसटी भवनाच्या ८ व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही आग लागली असून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग लेव्हल 4 म्हणजेच गंभीर स्वरूपाची आग असल्याचा इशारा देण्यात आला आहे.