जुगाराच्या व्यसनाही तरुण महागड्या वस्तूंच्या चोरीकडे वळला

0 1

पाळधीच्या अक्षय छाडेकरला पुन्हा कॅमेर्‍या चोरीच्या गुन्ह्यात अटक ; दोनदा जामीनावर बाहेर पडल्यावर चोरी ; दोन कॅमेर्‍यासह एक लॅपटॉप हस्तगत

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीतील दुकानातून गल्लयातून पैसे लांबविल्याच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली, यात जामीन मिळाल्यावर त्याच दिवशी संशयिताने देशपांडे मार्केटमधील पुष्पक स्टुडीओतून कॅमेरा चोरला होता, या गुन्ह्यातही एलसीबीने मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यातही कारागृहातून बाहेर पडताच चोरट्याने नवीपेठमधील मार्तंड फोटो स्टुडिओमधील एक लाखाचा कॅमेरा लांबविला होता. या गुन्हयात शहर पोलिसांनी शनिवारी रात्री 10 मुसक्कया आवळल्या आहेत. अक्षय प्रकाश छाडेकर वय 21 रा. पाळधी असे संशयिताचे नाव आहे. महिनाभरात पोलिसांनी अटक केल्यावरही सुटताच त्याने शहरात चोर्‍यांची हॅट्रीक केली आहे. जुगाराचे व्यसन लागले अन् पैसे नसल्याने तो महागड्या वस्तूच्या चोरीकडे वळल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे.

पहिल्यांदा एमआयडीसीच्या गुन्ह्यात अटक
कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केटमध्येदिपक किसन स्वामी यांचे दुकान आहे. या दुकानावर पाण्याचे जार, थरमास याची विक्री केली जाते. या दुकानाच्या गल्ल्यातील तीन हजार रूपये चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसीच्या दाखल गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय छाडेकर ला 14 मे रोजी पहूर पाळधी येथून अटक केली. यात त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडही झाली होती.

जामीनावर सुटताच देशपांडे मार्केटमध्ये डल्ला
एमआयडीसीच्या गुन्ह्यात 16 रोजी अक्षयला जामीन मंजूर झाला. यानंतर 17 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास शहरातील देशपांडे मार्केटमध्ये असलेल्या विजय पूना बारी रा.विठ्ठलपेठ यांच्या पुष्पक स्टुडिओतून संशयित अक्षय छाडेकरने ने निकॉन कंपनीचा 70 हजार रुपये किमतीचा कॅमेरा चोरला होता. अक्षय कॅमेरा विकण्यासाठी गेल्याबाबतची गोपनीय महिती स्थानिक गुन्हे शाखेचे विजय शामराव पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकासह अक्षयला पहूर येथून अटक केली होती. 18 रोजी बारी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात झाला होता.

दोन कॅमेर्‍यांसह एक लॅपटॉप काढून दिला
जिल्हापेठच्या गुन्ह्यात कारागृहातून जामीनावर सुटल्यावर 27 मे रोजी पुन्हा अक्षयने नवीपेठेत ग्राहकांना दुकानात बसवून थोड्यावेळासाठी बाहेर गेलेल्या सतीश मार्तंड जगताप (रा.प्रभात चौक, जळगाव) यांचा एक लाख रुपये किमतीचा कॅमेरा नवी पेठेतील मार्तंड फोटो स्टुडीओतून लांबविला होता. याप्रकरणी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, प्रितम पाटील यांच्या पथकाने 1 जून रोजी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पाळधी येथून बसमध्ये बसलेल्या अक्षयला ताब्यात घेतले. अशा प्रकारे महिनाभराच्या आत अक्षयने चोरीच्या घटनांनी हॅट्रीक केली आहे. अक्षय छाडेकर याच्याविरुध्द चोरी व घरफोडीचे आठ गुन्हे दाखल आहे. जुगाराचे व्यसन लागले. जुगारासाठी पैसे हवे म्हणून तो चोरीकडे वळला. यात तो लॅपटॉप, कॅमेरा अशा महागड्या वस्तूंची चोरी करतो. मिळेल त्या किमतीत त्या विक्री करुन पैसे मिळाल्यावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला रविवारी न्याायलयात हजर करण्यात आले. एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान अक्षयने शहरात जगताप यांच्यासह सिंधी कॉलनीतून एक कॅमेरा चोरला होता. दोन्ही कॅमेरे त्याने काढून दिले असून भुसावळ येथून चोरलेला 25 हजार रुपयांचा लॅपटॉपही जप्त केला आहे.