जुनोन्याच्या विवाहितेची आत्महत्या

0

बोदवड – तालुक्यातील जुनोना येथील सुवर्णा साहेबराव पाटील (27) यांनी शनिवारी पहाटे काही तरी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. याबाबत विकास तोताराम पाटील (चिंचखेडा सीम, ता.बोदवड) यांनी बोदवड पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली. तपास हवालदार संजय भोसले करीत आहेत. दरम्यान, विवाहितेने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र कळू शकले नाही.