Saturday , March 17 2018

जुन्नरचा आदिवासी युवक बनला दिग्दर्शक

नारायणगाव । ऐतिहासिक जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, धार्मिक तीर्थक्षेत्र, पर्यटनास अनुकूल असलेला परिसर तसेच इतर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. असे असले तरी या भागात अनेक लोककलावंत, तमासगीर, साहित्यिक, सिनेकलावंत यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. याला आता आदिवासी कलावंतही अपवाद राहिले नाहीत. जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ येथे आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. कालपर्यंत येथील चित्रपट क्षेत्रात आदिवासी दिग्दर्शक नव्हतेच; त्याला आता कुंडलिक केदारी या आदिवासी कलावंताने छेद दिला आहे.

हा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रदर्शित होणार असून यातील मुख्य कलावंत अभिजित भगत, पल्लवी कदम, सुरेश विश्‍वकर्मा, मिलिंद जाधव, राधिका मुठे, रामचंद्र धुमाळ, माऊली पुराणे, मुकुंद काळे, रमेश कदम, महेंद्र बुर्‍हाडे, विद्या पाटील, पूजा चांदेकर व राहुल निगडे हे आहेत. आदिवासी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कुंडलिक केदारी यांनी आदिवासी पैलवानाच्या जीवनावर या चित्रपटाची निर्मिती केली असून याच जुन्नरच्या मातीतील होतकरू कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. यामध्ये देवेंद्र कुलकर्णी, संजय बोर्‍हाडे, मच्छिंद्र भास्कर, शर्मिला पुंड, प्रियंका अस्वले, ज्ञानेश हडवळे यांचा समावेश आहे. केदारी यांचा जन्म जुन्नर तालुक्यतील अतिदुर्गम खैरे या पाड्यात झाला. प्राथमिक शिक्षणाची सोयसुद्धा तेथे नव्हती. जुन्नरला तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृहात राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. नोकरीनिमित्त पुणे शहरात आले. नोकरी करत त्यांनी नाट्य-चित्रपट कला आत्मसात केली.

हे देखील वाचा

उद्यानाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यास मंजुरी

ठराव एकमताने मंजूर झाला सांगवी : पिंपळे सौदागर येथे विकसित होत असणार्‍या उद्यानाला राजमाता जिजाऊ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *