जुन्या वादाच्या कारणावरून एकाला मारहाण

0

जळगाव । जुन्या वादाच्या कारणावरून एकाला चौघांनी मारहाण केल्याची घटना रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तांबापुरात घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीसात मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष निंबा जाधव (वय-28) रा. तांबापूरा याला आरोपी महेश बापू म्हस्के, मोहनसिंग जगदीश बावरी, मोनूसिंग जगदीश बावरी आणि मनोज उर्फ योगेश अरूण नाथ चौघे रा.तांबापुरा यांनी जुन्या वादाच्या कारणावरून रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तांबापुर्‍यात मारहाण केली. यात चौघा आरोपींनी काठी व काचेच्या बाटलीने मारहाण केल्याने सुभाष जाधव हे जखमी झाले. जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुभाष जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश बापू म्हस्के, मोहनसिंग जगदीश बावरी, मोनूसिंग जगदीश बावरी आणि मनोज उर्फ योगेश अरूण नाथ यांच्या विरोधात मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निंबाळकर करीत आहे.