ज्यादा दराने दारू विक्री : फैजपूरातील दुकानदारांवर गुन्हे दाखल होणार

0

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एस.एल.आढाव यांची माहिती

फैजपूर- शहरातील एक वाईन शॉपसह दोन देशी दारू दुकानांवर जादा दराने मद्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानतर रविवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी या दुकानांची तपासणी एकच खळबळ उडाली. या दुकानांवर खात्यांतर्गत विभागीय गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांनी दिली. दरम्यान, न्हावी येथील देशी दारू दुकानाचीदेखी तपासणी करण्यात आली.

तपासणीत ज्यादा दराने दारू विक्री उघड
रविवारी दुपारी शहरातील जायस्वाल अ‍ॅण्ड जायस्वाल ब्रॅण्डी हाऊस या वाईन शॉपसह के.जी.अवतारणी, एस.आर.गौंड यांच्या दोन देशी दारू दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी अचानक तपासणी केली. या तपासणीत वाईन शॉपसह देशी दारू दुकानांवर जादा दराने मद्याची विक्री होत असल्याची बाब उघड झाली. यामुळे या दुकानांवर खात्यांतर्गत विभागीय गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्कचे विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. या पथकात विभागीय निरीक्षक संजय कोल्हे, बबन देवकाते, के.एन.बुवा यांचा समावेश होता. दरम्यान, अशाच प्रकारची तपासणी यावल तालुक्यातील साकळी, न्हावी व यावल येथे करण्यात आल्याची माहिती अधीक्षक आढाव यांनी दिली.