Sunday , March 18 2018

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांनी भरला राज्यसभा उमेदवारी अर्ज 

मुंबई :- ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत कॉग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, गटनेते शरद रणपिसे, खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, कृपाशंकर सिंह, सचिन सावंत उपस्थित होते. दुपारी पावणेबाराच्या सुमारास काँग्रेसच्या नेत्यांसोबत कुमार केतकर विधानभवनात आले. काँग्रेसने जाहीर केलेल्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीत अनपेक्षितपणे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे नाव समोर आले. गेल्या चार दशकांपासून पत्रकारितेचा गाढा अनुभव पाठीशी असलेल्या केतकरांसारख्या अनुभवी संपादक-पत्रकाराची निवड करून राहुल गांधी यांनी धक्कातंत्र अवलंबल्याचे मानले जात आहे.
केतकरांच्या पदरात निष्ठेचे फळ  
गेल्या चार दशकांपासून माध्यमक्षेत्रात कार्यरत असलेले केतकर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विचारांचे समर्थक मानले जातात. गांधी घराण्याशी एकनिष्ठतेचा आरोपही केला जातो. आणीबाणीचे समर्थन करणारे पुस्तक देखील त्यांच्या नावावर आहे. सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला, तेव्हा त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत सोनिया गांधीचे समर्थन करणारे केतकर एकमेव संपादक होते. महाराष्ट्राचे राजकारण केतकर यांनी जवळून अनुभवले आहे. महत्वाच्या राजकीय-सामाजिक स्थित्यंतराचे साक्षीदार ठरले आहेत. त्यामुळे राज्याची कुंडली माहित असलेल्या केतकरांची वर्णी राज्यसभेवर लावून काँग्रेसने मित्रपक्षांना शह दिल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

हे देखील वाचा

पर्यटक बनून बनावट नोटा वटवणार्‍या बंगालच्या तरुणाला पकडले!

उरण । दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा वटविणार्‍या एका भामट्याला मोरा पोलिसांनी अटक केली. उरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *