ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन !

0

पुणे: प्रख्यात स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांसाठी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज गुरुवारी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आजच संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.