झाडाची फांदी अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापालिका अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

0

चिंचवड ः झाडाची फांदी पडून दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 9 डिसेंबर 2019 रोजी कस्तुरी मार्केट, चिंचवड येथे झाला. याप्रकरणी शनिवारी (दि. 18) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश उत्तम कारंडे (वय 50, रा. कृष्णानगर, चिंचवड), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ धनशाम उत्तम कारंडे (वय 53, रा. शिवतेज नगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्ष समितीच्या (उद्यान विभाग) सबंधित अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनशाम यांचे भाऊ रमेश कारंडे हे त्यांच्या दुचाकीवरून 9 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास कस्तुरी मार्केटकडून थरमॅक्स चौकाच्या दिशेने जात होते. ते कस्तुरी मार्केटजवळ अमृततुल्य समोर आले असता रस्त्याच्या बाजूच्या झाडाची एक फांदी त्यांच्या अंगावर पडली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.