‘झुंड नही कहिए सर, टीम कहिये टीम’; बहुप्रतीक्षित ‘झुंड’चा टीझर रिलीज !

0

मुंबई : सैराटच्या दमदार यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या झुंड सिनेमाचा दमदार टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये हातात विटा, साखळ्या, बॅट, हॉकी स्टिक घेतलेल्या मुलांचा एक ग्रुप दिसत आहे. टीझरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड नही कहिए सर, टीम कहिये…टीम’ या वाक्याने होते. अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवर हा टीझर शेअर केला आहे. सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण नागपुरात झाले असून हा चित्रपट 8 मे 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. कालच सोमवारी २० रोजी झुंडचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. ज्यात अमिताभ बच्चन पाठमोरे उभे असलेले दिसत आहेत.

या चित्रपटाची कथा फुटबॉल प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अनेक वादांना बाजूला सारत हा चित्रपट अखेर पूर्ण झाला आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच अमिताभ यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर निर्मात्यांनी मनधरणी केल्यानंतर अमिताभ बच्चन पुन्हा या चित्रपटात काम करण्यास तयार झाले आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिकेत दिसणार आहेत.