झेड.पी. अध्यक्षांची रावेर पं.स.ला सरप्राईज व्हिजीट; बेशिस्त व्यवस्था पाहून कमालीच्या नाराज !

0

रावेर: जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी आज गुरुवारी रावेर पंचायत समितीला अचानक सप्राईज भेट दिली. यावेळी कर्मचा-यांची एकच धांदल उडाली. अनेकांकडे ओळपत्र नव्हते, काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयात हजर नव्हते. अध्यक्षा आल्याचे कळताच अधिकारी, कर्मचाऱ्यांना घाम फुटला. अध्यक्षांच्या होमग्राउंड असलेल्या रावेर पंचायत समितीतच असा बेशिस्त कारभार असल्याचे पाहून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. दैनिक जनशक्तीकडे त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. हा प्रकार खपवून घेणार नाही असेही त्यांनी सांगितले.

पंचायत समितीच्या सभागृह पाहून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याने कर्मचारी कोण आणि सामान्य नागरिक कोण? असा प्रश्न अध्यक्षांनाच पडला. यावेळी पंचायत समितीचे सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती पी.के.महाजन, गटविकास अधिकारी सानिया नाकाडे यांनी अध्यक्षांचा सत्कार केला.