ट्रक-आयशरच्या धडकेत आयशर चालक ठार

0

मुक्ताईनगर- आशिया महामार्ग क्रमांक 46 वर हरताळा फाट्याजवळील यादव ढाब्यासमोर ट्रक व आयशर वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. महंमद जकिर आली अहमद (कूपठा – वाशिम, ता.कारंजा, जि.वाशिम) यांच्या फिर्यादीनुसार ट्रक (क्रमांक एम.एच. 28 बी. 7920) जळगाव-भुसावळमार्गे वाशिमकडे जात असताना मलकापूरकडून नाशिकडे येणारी आयशर (क्रमांक एम.एच.15 डी.के. 1002) ची हरताळा फाट्याजवळील यादव ढाब्या समोरा-समोर धडक होऊन आयशर चालक कृष्णा यादवराव माकोडे (रा.वाघोळा, ता. मुलताई, जि.बैतूल (मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला. तपास पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ पवार करत आहेत.