ट्रॅक्टर अपघातातील यावलच्या जखमीचा मृत्यू

0 1

यावल- शहरातील रहिवासी संजय भगवान भोई यांचे वाळू घेवून येणार ट्रॅक्टर कलंडल्यानंतर त्यात जखमी झालेल्या गफ्फार हमदू पटेल (50, रा.बोरावल गेट, यावल) यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 2 फेब्रुवारी रोजी ट्रॅक्टर वाळू घेऊन शहरात येत असताना खंडोबा मंदिराजवळ भरधाव ट्रॅक्टरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते रस्त्याच्या कडेला कलंडल्यानंतर ट्रॉलीवा बसलेले गफ्फार हमदू पटेल हे दबले जावून गंभीर जखमी झाले होते. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्यानंतर प्रकृती अधिक खालवल्याने त्यांना भुसावळात खासगी रूग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले असता रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली तर सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मयत गफ्फार हमदू पटेल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलेे, दोन मुली असा परीवार आहे.