Friday , February 22 2019

‘ठाकरे’मध्ये सचिन खेडेकरांचा आवाज बदलला!

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांचा आवज बदलावा अशी मागणी गेली काही दिवस जोर धरु लागली होती. जो ट्रेलर रिलीज झाला होता त्यामध्ये सचिन खेडेकरांचा आवाज ऐकायला मिळाला होता. तो आवाज बदलावा अशी मागणी केल्यानंतर निर्माता संजय राऊत यांनी यावर सकारात्मक विचार करणार असल्याचे म्हटले होते.

नुकतेच चित्रपटातील ‘कोण आला रे कोण आला’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यातील दोन प्रसंगात बाळासाहेबांची व्यक्तीरेखा साकारत असलेल्या नवाजुद्दीनच्या तोंडी डायलॉग आहेत. हे दोन्ही डायलॉग सचिन खेडेकरांच्या आवाजातील नाहीत. याठिकाणी हुबेहुब बाळासाहेबांचा आवाज ऐकायला मिळतो. यामुळे हा आवाज कोणाचा असा प्रश्न पडतो. हा आवाज चेतन शशीतल यांचा असल्याचे समजते.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बसस्थानकातून चार लाखांचे दागिने असलेली बॅग लांबवली

जळगाव | जळगाव येथील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातून 411006 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!