Wednesday , February 20 2019
Breaking News

डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरची बंदी कायम – उच्च न्यायालय

मुंबई : महाराष्ट्रात गणेशोत्सव मिरवणुकीच्या काळात डॉल्बी आणि डीजेचा आवाज बंदच राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं तसा निर्णय दिला असून या निर्णयामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि वयोवृद्धांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डिजे अथवा डॉल्बी मालकांनी दाखल केलेल्या बंदीविरोधी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय. डीजेंना विसर्जन मिरवणुकीत परवानगी देण्यास राज्य सरकारनं तीव्र विरोध केला होता.

गणेशोत्सवा दरम्यान दरवर्षी विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ मोठे डीजे वाजवले जात असल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं. मात्र यंदा राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटिसा पाठवून डीजे आणि साऊंड सिस्टीमची गोदामे गणेशोत्सवपर्यंत बंध केली होती. ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांकडून अशा प्रकारे कारवाई होत असल्याने आणि अघोषित बंदी घातली जात असल्याने साऊंड सिस्टीम चालक-मालकांची संघटना असलेल्या प्रोफेशनल ऑडीयो अँड लाइटिंग असोसिएशनने (पाला) उच्च न्यायालयात धाव घेतली होती.मात्र, न्यायालयानं आज ही याचिका फेटाळून लावली आहे.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

शिंदखेडा पंचायत समितीचा लघूसिंचन अभियंता एसीबीच्या जाळ्यात

योजनेच्या लाभासाठी चार हजारांची लाच भोवली ; धुळे एसीबीची कारवाई शिंदखेडा- एमआरजीएस योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!