डीबीटी आणि जीएसटी लोकशाहीतील मूक क्रांती: अर्थमंत्री निर्मला सीतारामन

0

नवी दिल्ली: सरकारने दिलेला लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी राबविलेली डीबीटी (थेट हस्तांतरण) आणि कर प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी सुरु केलेली जीएसटी (वस्तू आणि सेवाकर) प्रणाली भारतीय लोकशाहीतील मूक क्रांती असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केले. निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज रविवारी १ मार्चला ४४ व्या Civil Accounts Day event organised by Controller General of Accounts (CGA) चे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्याबोलत होत्या. भारताने राबविलेल्या डीबीटी आणि जीएसटी प्रणालीचा जगभर कौतुक होत आहे. जेथे जाल तेथे डीबीटी आणि जीएसटीबद्दल विचारले जात असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

सरकारने सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याने मोठी आर्थिक बचत झाली आहे. तब्बल एक लाख कोटींची बचत झाल्याची माहिती यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिली. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना यश आले आहे. प्रशासनात पारदर्शकता आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.