डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांच्यावर कारवाईची मागणी

0 1

चाळीसगाव येथे पीपल्स सोशल फाऊंडेशनचे तहसिलदारांना निवेदन

चाळीसगाव – जातीयवादी वक्तव्य करणार्‍या बिड जिल्ह्यातील महीला उपविभागीय पोलीस अधिकारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीपल्स सोशल फाऊंडेशन चाळीसगाव च्या वतीने तहसिलदार चाळीसगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पीपल्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पोळ, किरण जाधव, मंगेश सावळे, प्रकाश पाटील, प्रवीण जाधव, शुभम महाजन, अरविंद खेडकर, राहुल सावळे, पवन महाजन, सागर अहिरे, अनिकेत निकम, अमोल पवार, भुषण पाटील, भूषण बाविस्कर, स्वप्निल डहाळे, मुकुल निकम, अमोल पवार आदि उपस्थित होते.

काय म्हटले आहे निवेदनात?
बीड जिह्यातील माजलगाव तालुक्यातील पोलीस उप-विभागीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या भाग्यश्री नवटके या महिला अधिकार्याने दलित मुस्लीम विरोधी वक्तव्य केले आहे. सदर प्रकरणात समोर आलेल्या वीडीओ मधून, आपण कश्या प्रकारे दलितांचा छळ करतो, अट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आपण दलितांवरच उलट गुन्हे दाखल करतो व आपल्याला दलितांबद्दल किती चीड आहे. या प्रकारची वक्तवे करताना त्या दिसत आहे. तरी प्रशासनात असून आपल्या पदाची गरिमा न राखणार्‍या जातीवादी अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर कठोर स्वरुपाची कार्यवाही करण्यात यावी. तसेच सबळ पुरावे असताना देखील त्यांची औरंगाबाद येथे फक्त बदली करण्यात आली, त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता चौकशी आयोग नेमण्यात यावा, चौकशी दरम्यान त्याचे वेतन पूर्णपणे बंद करण्यात यावा, सदर व्हीडीओ तीन महिन्यापूर्वीचा असून विडीओ पसरवणार्‍या व्यक्तीचा तत्काळ शोध घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.