डीवायएसपी रोहन यांच्या पथकाचे सट्टा-जुगारांसह गावठी दारुवर धाडसत्र

0

जळगाव – शहरातील कानळदा तसेच शनिपेठेतील अवैध धंद्यामुळे त्रस्त महिलांनी पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची भेट घेवून कारवाईची मागणी केली होती. त्याची दखल घेत डॉ. रोहन यांनी पथकासह जळगाव शहरासह तालुक्यातील सट्टा-जुगार तसेच गावठी दारुच्या अड्डयावर छापे टाकून कारवाई केली. संबंधित घटनांप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईचे स्वागत होत आहे.

पोलिस उपअधिक्षक डॉ.रोहन यांच्या पथकातील अनिल पाटील, रविंद्र मोतीराया, सचिन साळुंखे, फिरोज तडवी, राहुल पाटील, जुबेर तडवी, महेंद्र सोनवणे, किशोर पाटील, दिनेशसिंग पाटील, अशोक पवार या पथकाने सर्वप्रथम वाल्मिकनगरात अवैध दारु विक्री करणारा शरद रामदास बाविस्कर (वय 40) याच्याकडे 2 हजार 50 रुपयांची दारु जप्त केली. सुमनबाई प्रभाकर सैंदाणे (वय 60, रा.वाल्मिकनगर) हिच्याकडून 1 हजार 230 रुपयांची, खटाबाई सुरेश साळुखे (वय 40) हिच्याकडून 1 हजार 800 रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. तर नेरीनाका स्मशानभुमिजवळ दारु विक्री करणार्‍या उमाकांत भास्कर कोल्हे (वय 51, रा.विठ्ठलपेठ) याच्यावरही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 2 हजार 490 रुपयांची देशी-विदेशी दारु जप्त केली आहे. आदींनी ही कारवाई केली.

सट्टा पिढीवरही मारले छापे
शहर, तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारु विक्रीच्या दुकानांसह सट्टापेढीवर पोलिस उपअधिक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या पथकाने छापे मारले. यात शनिवारी दुपारी 1.15 वाजता कानळदा गावात मनोज रतन पारधी, गोकुळ रामदास तायडे (वय 53, रा.कानळदा) व राजु मंगा भोई (वय 46, रा.कानळदा) हा सट्टा खेळवत असताना आढळुन आला. व त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 1 हजार 730 रुपये रोख व सट्टा खेळवण्याचे साहित्य मिळुन आले. तर गोकूळ तायडे कडे 760 रुपये मिळाले ओहत. पोलिस उपनिरीक्षक, कदीर तडवी, अनिल पाटील, मगन मराठे, उमेश भांडारकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तीघांच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.