डीवाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

0

एका तासात 307 नागरिकांचा रक्तदाब तपासणीचा रचला इतिहास

पिंपरी चिंचवड: जागतिक हृदय दिनानिमित्त ग्लेनमार्क फार्मा कंपनीने रक्तदाब तपासणी मोहीम घेतली. या मोहीमेत देशभरातील 37 संस्थाकडून सहभाग घेतला. पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी (दि.24) 307 नागरिकांचा रक्तदाब तपासणी करुन उच्चांक गाठला आहे. या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यापीठीचे कुलगुरु डॉ. एन.जे.पवार, डॉ. यशराज पाटील, डॉ. जे.एस.भावलकर, डॉ. ए.एल.काकराणी, डॉ. मानसी हराळे उपस्थित होते.

देशभरात रक्तदाब तपासणी मोहिम…
जागतिक हृदय दिनानिमित्त ग्लेनमार्क फार्मा कंपनी सीएसआर फंडातून विविध उपक्रम राबवित असते. यंदा ग्लेनमार्क फार्मा कंपनीने देशभरात 41 पैकी 37 मेडीकल संस्थाची निवड केली. त्यामधून देशभरात नागरिकांना वाढलेला रक्तदाब तपासणी मोहीम घेतली. एका तासात कमीत कमी 200 व्यक्तीचे रक्तदाब तपासणीचे टार्गेट दिले. पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील वैदकीय महाविद्यालयाने रविवारी (दि.24) सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत 307 नागरिकांचा रक्तदाब तपासणी करण्यात आली. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या मोहीमेत औषध विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए.एल.काकरानी, सहायक प्राध्यापक डॉ.मानसी हराळे यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला.