डॉ.सागर गरुड आणि सिद्धार्थ लुनिया मित्र परिवारातर्फे किराणा मालाचे वाटप

0

शेंदूर्णी: येथे आज पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.सागर गरुड व सिद्धार्थ लुनिया मित्र परिवाराच्या सहकाऱ्यांनी वार्ड क्रमांक १ मधील रेल्वे स्टेशन, अतुल नगर,साईनाथ नगर,शिवाजी नगर,साम्राट अशोक नगर ,वार्ड क्रमांक २ मधील डॉ.आंबेडकर नगर, नामदेव नगर ,वार्ड क्रमांक ८ मधील खाटीक गल्ली, कुरेशी वाडा व उर्वरित सर्व,१७ वार्ड मधील गरजू गरीब तसेच विधवा व अपंग व्यक्तींच्या कुटुंबांना १५ दिवस पुरेल इतक्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले. सोबतच मास्क व हात धुण्यासाठी साबण देखील देण्यात आला. २५० गरजूंना मदत देण्यात आली. 25 मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत पाचोरा येथिल विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात पाचोरा,भडगाव, चाळीसगांव, एरंडोल,सोयगाव, जामनेर, व पारोळा या ७ तालुक्यातील जनतेसाठी बाह्य रुग्ण तपासणी मोफत करण्यात आली आहे.